
नायजेरियाचे दहशतवादी संघटन बोको हरामने अनेकदा शाळेच्या मुला-मुलींचे अपहरण केले आहे. बोको हरामने शाळेवर हल्ला करत 300 पेक्षा जास्त मुलांचे अपहरण केले होते. त्यातील अर्ध्यापेक्षा कमीजण घरी वापस आले. या संघटनेने 2014 मध्ये अशाच प्रकारे 276 मुलींचे अपहरण केले होते. या सर्व मुलींना बोर्डिंग स्कूलमधून गायब करण्यात आलं होतं. त्यानंतर देशात एकच खळबळ माजली होती. 4 वर्षानंतर यातील 107 मुलीच वापस परतल्या. पण अजूनही अर्ध्यापेक्षा अधिक मुली बेपत्ता आहेत.
कोरोना लशीमध्ये डुकराचं मांस? मुस्लिम धर्मगुरुंमध्ये लस टोचून घेण्याबाबत मतभेद
अफ्रीकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या नायजेरिया देशाचा बोको हरामसोबत 10 वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. बोको हरामने देशात अराजकता माजवली आहे. अपहरण, हत्या, हल्ला अशा घटना नेहमी घडत असतात. शाळेतील विद्यार्थ्यांचे अपहरणही या संघटनेकडून करण्यात आले आहे. 2002 मध्ये स्थापना झालेली बोको हराम संघटना नायजेरिया सरकारला हटवून इस्लामिक स्टेट निर्माण करु पाहात आहे. या संघटनेचे अधिकृत नाव जमात एहल अस-सुन्ना लिद-दावा वल-जिहाद असं आहे. मैदुगुरी शहरात या संघटनेचे हेड क्वार्टर आहे.
बोको हरामने मुलींचे अपहरण केल्यानंतर देशात खळबळ उडवून दिली होती. सरकार, राजकीय पक्ष, विविध संघटना आणि माध्यमं या मुलींना परत आणण्यासाठी प्रयत्न करु लागले. यासाठी सोशल मीडियावर Bring Back Our Girls हे अभियानही सुरु करण्यात आले. त्यानंतर वाढत्या दबावामुळे बोको हरामने जवळजवळ अर्ध्या मुलींना सोडून दिले.
भारतविरोधी भूमिका ओलींना भोवली! नेपाळमध्ये मध्यावधी निवडणुका जाहीर
सूटका झालेल्या मुलींकडून कळालं की त्यांना दाट जंगलात ठेवण्यात आले होते. जेवण बनवणे, मजूरी करुन घेणे यासोबत त्यांना सेक्स स्लेव्ह बनवून ठेवण्यात आले होते. मुलींना टेंटमध्ये ठेवलं जातं होतं, त्यानंतर मिलिटेंट एका मुलीची निवड करायचे. अनेकांची लग्न झाली होती आणि अनेक मुली गरोदर झाल्या होता.
बोको हरामच्या इतक्या अत्याचारानंतरही त्या संघटनेला कोणी हात लावू शकलेला नाही. स्थानिक लोकांमध्ये या संघटनेचा दबदबा आहे. नायजेरियाचे 6 प्रांत या संघटनेच्या कंट्रोलमध्ये आहेत. यामध्ये सरकार कसलाही हस्तक्षेप करत नाही. ड्रग्स आणि तेल माफिया म्हणून या संघटनेचे दहशतवादी काम करतात. त्यामुळे या संघटनेकडे पैसाही भरपूर आहे. स्थानिक लोकांचे समर्थन नसल्याने सैन्य देखील या भागात कारवाई करत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.